जमिनी खरेदी करण्यापूर्वी/ केल्यानंतर 7/12 उताऱ्यातील चुका ऑनलाइन कशा दुरुस्त करणार.

 जमिनी खरेदी करण्यापूर्वी/ केल्यानंतर 7/12 उताऱ्यातील चुका ऑनलाइन कशा दुरुस्त करणार.


सध्या काहीशी जमीन खरेदी करायची असेल, तर त्या जमिनीचा इतिहास काय आहे हे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. यामुळे हजारो- लाखो-करोडो रुपये देऊन खरेदी केलेली जमीन कोर्ट - कचऱ्याचे चक्कर मारावी लागतात. आपल्याला माहीतच हवं की खरेदी करण्यापूर्वी जमिनीचा मूळ मालक व मूळ हक्कदार कोण आहे? त्यानंतर जमिनीत काय बदल झाले यासाठी तुम्ही 7/12 ऑनलाइन काढू शकतात. हा 7/12 उतारा मात्र अचूक आवश्यकता आहे; या ऑनलाईन 7/12 मध्ये जर काही चुकला असतील तर कशा दुरुस्त करायच्या हे आपण पाहू या...


काय आहे 7/12 उतारा दुरुस्ती प्रक्रिया?


■ दुरुस्त करण्या करिता आपणास सर्वात आधी https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या वेब साईटला भेट द्यावी/ घ्यावी लागेल.


■या वेबसाईटच्या पहिल्या पेजवर सर्वात खाली उजव्या बाजूला '7/12 दुरुस्ती साठी ई-हक्क प्रणाली' असे दर्शविले जाईल, तिथेच खाली या https://pdeigr.maharashtra.gov.in/ साइटवर क्लिक करून तिथे भेट द्या.


■पुन्हा PDF असे नाव दिसणाऱ्या एक पेज ओपन होईल. या पेजवर सर्वात खाली गेल्यानंतर तिथे दिलेल्या ' Proceed To Login' या नाव दिसणाऱ्या पर्यायावर क्लिक करा. तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे अकाऊंट सुरू करायचे आहे, त्यासाठी ' Creat New User ' यावर क्लिक करुन पूर्ण करायचे आहे.


■ त्यानंतर तुमच्या समोर ' New User Sign Up ' या नावाचे नवीन पेज ओपन होऊन उघडेल. नवीन युजर अकाउंट साइन इन करण्यासाठी तुमची Contact Information तिथे देऊन सेव बटन दाबा.


■या आलेल्या नवीन पेजवर खाली ' Registration Successful. Please Remember Username & Password For Future Transactions. ' असे एक वाक्य किंवा मेसेज दिसेल. मग ' Back ' या बटनावर दाबून पुन्हा एकदा लॉग इन करा.


■लाॅगिन झाल्यानंतर ' Details ' नावाच एक पेज ओपन होईल. तिथे ¹Registration, ²Marriage,³E-Filing,⁴ 7/12 Mutations असे अनेक पर्याय उघडतील. पण या मधील सातबारा चूक दुरुस्त करण्यासाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ' 7/12 Mutations ' या बटनावर क्लिक करा.


■त्या नंतर आपणास एक पॉप-अप संदेश दिसेल. मग तुम्हाला 'User' तुमचा रोल सिलेक्ट करावा लागेल. तुम्ही सामान्य नागरिक आहात यासाठी ' User Is Citizen ' आणि बँकेचे कर्मचारी आहात तर ' User Is Bank ' यापैकी तुमचे जे क्षेत्र आहे त्या पर्यायावर क्लिक करा.


■आता आपल्यापुढे एक नवीन पेज ओपन होईल. तुम्हाला 7/12 मधील चूक दुरुस्ती करायची असल्यामुळे तोच पर्याय निवडा आणि जिथे दुरुस्तीबाबत अर्जात तुम्ही तुमची जी चूक दुरुस्त करायचे आहे ती माहिती अचूक न चुकता भरा.

Post a Comment

0 Comments