अकरावीच्या प्रवेशासाठी 'सीईटी' बाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, अकरावी साठी प्रवेश प्रक्रिया कशी असणार जाणून घ्या...

 


सध्या महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने काल म्हणजेच 16 जुलै दोन 2021 रोजी दहावीचा निकाल घोषित केला. Civid 19मुळे परीक्षा न घेतल्यामुळे मूल्यमापन पद्धतीने यावेळी निकाल सादर केला. यावेळी विक्रमी निकाल लागल्याने अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांना धावपळ करावी लागणार आहे.

10 वीचा निकाल लागताच,11वी प्रवेशाची लगबग सुरू झालेली दिसत आहे. दरवर्षीप्रमाणे 10वीतल्या गुणांच्या आधारे 11 वीची प्रवेशप्रक्रिया होणार आहे.
मात्र, यावेळी कोरूना मुळे दहावीची परीक्षा न झाल्यामुळे, राज्य सरकारने मूल्यमापनात द्वारे विद्यार्थ्यांना गुण दिले.

यामुळे राज्य सरकारने 11वी प्रवेशासाठी 'सीईटी' घेण्याचा निर्णय घेतलेला आहे... आहे. यासाठी येत्या सोमवारपासून म्हणजेच (19 जुलै 2021)ऑनलाईन नोंदणीला सुरुवात होणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिलेली आहे.

सर्व सर्व विद्यार्थ्यांना/ विद्यार्थ्यिना 1 एकोणवीस जुलैपासून, ऑनलाइन नोंदणी करतायेणार आहे. 'ओएमआर' उत्तर पत्रिके द्वारे 'ऑफलाइन' पद्धतीने ही परीक्षा होणार आहे
.

ह्या पद्धतीने होणार 'सीईटी' परीक्षा?

● 19 जुलै पासून ऑनलाईन नोंदणी होणार आहे
● 11 वी प्रवेशासाठी मार्ग 'सीईटी' परीक्षा
● राज्य मंडळाच्या 10 वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असलेले प्रश्न
● एकूण गुण-100
● बहुपर्यायी असलेले प्रश्न
●परीक्षा ओएमआर पद्धतीने होणार
●परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी उपलब्ध असणार


ह्या पद्धतीने होणार अकरावीचे प्रवेश?

1. 'CET' परीक्षेतील मार्कांच्या आधारे गुणवत्तेनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश होणार आहे
2. 'CET' परीक्षा देणाऱ्यांना अकरावी प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य मिळणार
3. त्यानंतर मोकळ्या राहिलेल्या जागांवर प्रवेश होणार
4.'CET' परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन दहावीच्या पद्धतीनुसार केले जाणार.

Post a Comment

0 Comments