अबब...! जमिनीच्या वादातून गोळीबार करून एकाच कुटुंबातील सहा सदस्यांवर हत्या झाली, पहा कसा झाला हा हत्याकांड...

शेत जमिनीवरून वाद कुठे ना कुठे चालूच असतो, ह्या वादातून भांडणेही होतात, तर काही भांडणात खूप जखमाही होतात. परंतु बिहार मधील एका गावात जमिनीतील वादावर मधून एकाच परिवारातील सहा व्यक्तींना गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली आहे.

बिहार येथील नालंदा जिल्ह्यात लोदीपुर गावामध्ये खळबळ जनक करणारा हत्याकांड झालेला आहे. हत्याकांड झालेल्या घटनेमुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडालेली आहे. हत्याकांड घटनेनंतर आरोपी पळून गेलेला आहे. तीन व्यक्ती जखमी झालेले आहेत त्या व्यक्तींना दवाखान्यात दाखल करण्यात आलेले आहे व त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

मृत व्यक्ती हे एकाच परिवारातले आहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे, यदु यादव, महेश यादव, धीरेंद्र यादव, शिवेंद्र यादव आणि विंदा यादव हे आहेत, व मिटु यादव, परशुराम यादव आणि मंटू यादव हे हत्याकांडात गोळीबार गंभीर रित्या जखमी आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहे.

लोदीपुर या गावात 50 बिघा जमीन आहे, याच जमिनीवरून आरोपी महेंद्र यादव, राजेश्वर यादव यांचा वरील परिवारासोबत वाद चालू होता. हे प्रकरण कोर्टात चालू असतानाही आरोपीने जबरदस्ती करून त्या रानात शेती करत होता. यावरून त्या तुनी परिवारात वाद निर्माण झाला. काही वेळाने हा वाद फार विकृत रूप देऊ लागला.

आरोपी महेंद्र यादव व राजेश्वर यादव याने एकाएकी बंदूकीतून अंधाधुंद गोळीबार सुरू केला चालू केला. यात चार जणांचा मृत्यू झाला व रुग्णालयात जाताना दोन जणांचा मृत्यू झाला. या घटनेत तीन जण अतिशय गंभीर जखमी झाले.

गोळीबार सुरू झाला त्यानंतर पीडित परिवाराने छबिला पूर पोलीस स्टेशनमध्ये याची माहिती दिली. परंतु पोलिसांनी दखल घेऊन लवकर घटनास्थळी आले नाहीत. यामुळे खूप मोठे हत्याकांड झाल्याचा आरोप सर्व समस्त गावकऱ्यांनी पोलीसांवर केला.

या हत्याकांडामुळे गावात सर्वस्व तणावाचे वातावरण आहे. मृत परिवार व गावकऱ्यांनी मृतदेह उचलून नेण्यास स्पष्ट नकार दिला. धक्कादायक घटनेनंतर दोन्ही आरोपी पळून पसार झालेले आहेत पोलिस त्यांचा घेत आहे.

Post a Comment

0 Comments