राज्याच्या गृह विभागात 2022 मध्ये 7231 पदांची पोलीस भरती होणार असाचे महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केले. ग्रामीण भागातील उमेदवारांना अधिक संधी मिळावी म्हणून अगोदर शारीरिक चाचणी त्यानंतर लेखी परीक्षा घ्यावी लागेल, असा कॅबिनेटने निर्णय घेतला. मात्र, तो निर्णय अध्याप कागदावर आला पुण्यात नसल्याने नवीन पोलीस भरती ही जुन्याच पद्धतीने म्हणजे, आधी लेखी परीक्षा आणि नंतर शारीरिक चाचणी घेतली जाईल, असा वास आहे. शासनाच्या नवीन जी. आर. नुसार राष्ट्रीय छात्रसेना (एनसीसी) च्या उमेदवारांना अधिक (बोनस) गुण दिले जातील.
एनसीसीचे
क प्रमाणपत्र-(परीक्षेच्या एकूण गुणाच्या 5 टक्के गुण,)
ब प्रमाणपत्र-(परीक्षेच्या एकूण गुणाच्या 3 टक्के गुण,)
अ प्रमाणपत्र-(परीक्षेच्या एकूण गुणाच्यात 2 टक्के गुण अधिक दिले जातील.)
परीक्षेचे स्वरूप-
लेखी परीक्षा-
पोलीस शिपाईपदासाठी 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान 35 टक्के (मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत 33 टक्के) गुण मिळवून उत्तीर्ण होतील त्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातील प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या 1:5 या प्रमाणात प्रवर्गनिहाय उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरविण्यात येईल.
शारीरिक चाचणी-
लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीतील एकूण गुणानुसार उमेदवारांची अंतिम निवड जाहीर करून त्यांना चारित्र्य व पूर्व चारित्र्य पडताळणी • अहवाल आणि वैद्यकीय तपासणीनंतर प्रशिक्षणासाठी पाठविले जाईल.




0 Comments