विधानपरिषद निवडणुकांचा निकाल कसा लागला त्याचा महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना अचानक पलटी मारली आणि त्या राजकारणाने वेग पकडला.
सर्वत्र पुढं काय होणार? व नेत्यांचे ट्विट अगदी जोरदारपणे चालू आहेत,न्यूज चैनल वरती देखील सर्वत्र हेच आपल्याला दिसते.
सरकार स्थिर राहील का?
की सरकार उसळणार?
इथपासून तर खरी गेम अशी?
असे सांगणारा सुद्धा खूप सारे जण तुम्हाला आजूबाजूला दिसत असतील.
परंतु या सर्व राजकीय धुरळा मध्ये महत्त्वाच्या बातम्या मात्र मागे पडलेला आपल्याला दिसत आहेत, आणि आज आपल्या एपिसोड मध्ये आपण नेमके याच बातम्या आहेत त्यात जाणून घेणार आहोत, ज्यांचा तुमच्या आमच्या विषयावरती नक्की डायरेक्टली परिणाम होणारे नमस्कार मी रितेश तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो.
शेतीसंदर्भात
सर्वप्रथम आपण बोलूया.शेतीसंदर्भात सांगितलं होतं, पाऊस जो आहे तो 20 मे ते 25 मे च्या आसपास पडेल पण आता 25 जून येण्याची वेळ आणि तरी देखील अजून पावसाचा कुठेच काही पत्ता नाहीये.अगदी तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला तिथे शेतकऱ्यांनी त्या पावसाच्या भरवशावर ती पेरणी केली, आणि त्याच्या नंतर पावसाने ओढ दिली आहे आणि याच्या मूळे सध्या बहुतांश ठिकाणी दुबार पेरणीचं संकट जे आहे ते उभा राहिलेले आहे.
आता सुरुवातीलाच पेरणी करताना खत आणि बियाणे तेसुद्धा ओरिजनल खूप सार्या शेतकऱ्यांनी संघर्ष केलेला असणारे आणि आता परत एकदा त्यांना या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे, कोणी पाऊस अजून चांगलं पडावा म्हणून भरोसा आले होते त्यांचा देखील अजून चांगलं बी मिळावा म्हणून आणि खत मिळावा म्हणून संघर्ष हा चालू आहे.
आसामचा पूर
आता आसामचा पूर. आता बघा जसा पावसाचा सीझन सुरू झालेला म्हणजे जी तारीख हवामान खात्याने दिली होती त्यापासून आतापर्यंत आसाम मध्ये दुसऱ्यांदा पूर आलेला आहे. आसाम मला पूर आणि ब्रह्मपुत्रा नदी यांचं नातं तर अगदी सुरुवातीपासून आहे, कायमच तिथे पूर आलेला आहे.
सध्या बघा परिस्थिती अशी आहे की 32 जिल्ह्यामधले जवळपास 55 लाख लोक या पुरामुळे बाधित झालेले आहेत. सर्वत्र अगदी कमरेच्या वरपर्यंत पाणी दिसते आणि आता या ठिकाणी झाले कसे ब्रह्मपुत्रा च्या जोडीला अजून एक बरात म्हणून नदी आहे आणी ती सुद्धा आलेली आहे, त्याच्यामुळे परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये अजून गंभीर होऊ शकते.
आता आसाम मधील जी पूर परिस्थिती आहे त्याच्या विरोधात तृणमूल काँग्रेस हे जोरदारपणे आंदोलन करताना दिसते, तेसुद्धा कुठे ज्या ठिकाणी महाराष्ट्रातले आमदार थांबलेले आहेत त्या ठिकाणी.
महाराष्ट्रातले आमदार आसाममधल्या गुवाहाटीमध्ये थांबलेत. तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते तेथे आंदोलन कशामुळे करतात की आसाम सरकार जी आहे या पूरपरिस्थिती वरती काहीतरी उपाययोजना करायची, त्याच्यावर नियंत्रण कसे मिळवायचं, लोकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देन हे न बघता या आमदारांची सोय करण्याच्या मागे लागलेला आहे. असा यांचा आरोप आहेत.
आता येणाऱ्या काळामध्ये बघावे लागेल की आसाम मधली परिस्थिती अशी राहील की ती बिघडते किंवा लवकरात लवकर दे चांगली व्हावीत.
अग्निपथ योजनेसंदर्भात
जी न्यूज आहे ती म्हणजे अग्निपथ योजनेसंदर्भात. या योजनेबाबत खूप सारा विरोध झाला. सैन्यामध्ये भरती साठी ही योजना सरकारने आणली, यांच्यानुसार आर्मीमध्ये, नेव्ही मध्ये आणि एअरफोर्समध्ये भरती होणारे जे कोणी भरती होतील त्यांची सेवा चार वर्षांसाठी असणारे, सहा महिन्याचे ट्रेनिंग आणि पुढे ते सेवा देतील. त्याच्यानंतर हे सर्वच्या सर्व जण निवृत्त होतील आणि परत फक्त पंचवीस टक्के जणांना परत पहिल्यापासून सैन्यामध्ये घेतले जाणारे.
आता विरोध झाला, राजकीय टीका देखील मोठ्या प्रमाणात झाली, परंतु सरकार त्यांच्या निर्णयावर ती ठाम राहिलं आणि आता परिस्थिती अशी आहे की आजच्या दिवशी (24Jun) इंडियन एअर फॉर्स भरती त्यासंदर्भात एप्लीकेशन चा रजिस्ट्रेशन आज सुरू होणारे. म्हणजे सरकारने हा मुद्दा आता लावून धरलेला आहे आणि याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सैन्यामध्ये भरती होणारे.
रुपया विक्रमी घसरला...
महत्त्वाची न्यूज म्हणजे रुपया जो आहे डॉलरच्या तुलनेमध्ये विक्रमी किमतीला घसरला.
कालच्या दिवशीची खरी महत्त्वाची न्यूज हिच होती रुपया अगदी आजवर कधीच नव्हता इतका घसरलेला आहे.
एका डॉलरच्या तुलनेत मध्ये 78 रुपये 32 पैसा रुपया घसरला आहे.आता तुम्हाला वाटू शकतं की त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होणार?
तर येणाऱ्या काळामध्ये महागाई अजून वाढेल, पेट्रोल-डिझेलच्या किमती नक्कीच वाढू शकतात, आणि ह्याच्या मुळे होणार काय परिणाम स्वरूप आरबीआयचे आहे ते रेपोरेट वाढू शकतो आणि पर्यायी होणार काय करते.
पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा..!
न्यूज आहे ती म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवडा संदर्भात. ज्या भागांमध्ये खाजगी कंपन्यांद्वारे चालेल जाणारे पेट्रोल पंप आहे, त्या भागामध्ये पेट्रोल आणि डिझेल यांचा तुडवडा फार जास्त पद्धतीने जाणवतोय आणि ग्रामीण भागामध्ये तर खूपच.
अगदी शहरी भागामध्ये पर्यंत धक जाणवते, आणि याला सरकारी ज्या पेट्रोल पंप कंपन्या आहेत किव्वा पेट्रोल संदर्भातल्या इतर कंपन्या आहेत त्यानी सुद्धा दुजोरा दिलेला आहे, की इंधन विक्री ही प्रचंड नुकसानकारक ठरते आणि हा तोटा कमी करण्यासाठी पुरवठा कमी झालेला आहे आणि पंप वाले पंप बंद सुद्धा ठेवते.
आता खूप सार्या जणांना हा सुद्धा अनुभव असेल की डिझेल जे आहे ते 130 रुपये लिटरने वगैरे त्यांना घ्यावे लागते,जेव्हा त्याची किंमत फार कमी आहे तरीसुद्धा त्या किमतीला घ्यावे लागते याचा अर्थ काय? तर पुरवठा कमी होतोय.
आता याचा शेतीला सुद्धा एका पद्धतीने तोटा होऊ शकतो?
तर कसं बघा पावसाने हाक दिलेली आहे ज्यांनी कुणी पेरणी केली असेल आणि ज्यांच्या जवळ पाणी उपलब्ध असेल किंवा पाटाला पाणी आलेलं असेल, तर ती काय करते त्या ठिकाणी इंजिन लावतील, कशासाठी? शेतामध्ये पाणी यावे ते इंजिन जे आहे ते चालतं कशावर? डिझेल वरती! तर त्यांना त्या डिझेल साठी जास्त किंमत मोजावी लागू शकते, म्हणजे आधीच दुबार पेरणीचे संकट, खात व उत्तम दर्जाचं ओरिजनल बियाण्यात मिळण्याचा देखील त्यांच्या समोर फार मोठा त्रास आहे, आणि आताही डिझेलची सुद्धा भयानक प्रकार आढळणार आहेत.
या सगळ्यात महत्वाच्या अशा पाच बातम्या एकच्या तुमच्या आमच्या आयुष्यावर ती डायरेक्टली प्रभाव पाडू शकतात.
@ पाच महत्त्वाच्या गोष्टी 2022.
@ तुमच्या आयुष्यावर भर देणाऱ्या पाच गोष्टी 2022.
@ महाराष्ट्रातील राजकारणातील पाच महत्त्वाच्या गोष्टी 2022.
@Readit News Marathi...
#FromReadit






0 Comments