सध्या भारत देशात अग्निविर या योजने विरोधात काही राज्यात भयानक प्रतिसाद मिळत आहे. अग्निविर योजनेच्या विरोधात असलेल्या काही संघटनांनी सोमवारी भारत बंदची बंड पुकारले आहे.
अग्निपथ या योजनेबाबत काही दिवसांपासून राजकारण व स्थानिक लोक व इतर राज्य खवळलेले आहेत.अशा मध्ये अचानक पणे भारतातील महिंद्रा उद्योग समूहाचे (आनंद महिंद्रा) यांनी देखील एक महत्त्वाचे विधान व महत्त्वाची घोषणा केलेली दिसत आहे.
आनंद महिंद्रा म्हणाले की हे..!
"अग्निपथ योजनेत जे कार्यशील असतील व जे सेवा करून चार वर्षानंतर माघारी येथील, त्यांना रोजगार देण्यासाठी भरतीची घोषणा करणार."
भारतातील पूर्ण जगभरात चर्चेत असलेले व लोकप्रिय असलेले व उद्योगपती व महिंद्रा उद्योग समूहाचे आनंद महिंद्रा यांनी "अग्निपथ" योजने बाबत होत असलेल्या काही दिवसां वरील प्रकारावर नाराजी व्यक्त केली.
भारत देशातील बहुतेक राज्यांमध्ये अग्निपथ या 2022 मोदी सरकार यांनी लष्करा बाबत आणलेल्या योजने विरोधात हिंसात्मक व ठिकाणी आंदोलन होत आहेत.
आनंद महिंद्रा म्हणाले की" गेल्या काही दिवसांपासून "अग्निपथ" या योजनेवर होत असलेल्या अविश्वसनीय विरोधामुळे मी दुखी आहे. मागील वर्षी म्हणजे 2020-21 मध्ये या योजनेबाबत विचार करताना मी असे वक्तव्य केले होते की, जे अग्निविर असतील ते जितके शिस्त व कौशल्यपूर्ण असतील त्यांना विशेष रोजगार मिळण्या इतपत साहस बनवेल. महिंद्रा उद्योग समूह हा अशा शिस्त व कौशल्य पूर्ण तरुणांचे नियुक्ती करण्यासाठी तत्पर आहे"
भारत देशांमधील सध्या अग्निपथ योजने विरोधात होत असलेल्या आंदोलन जाळपोळ तोडफोड यामध्ये सहभागी असणाऱ्या तरुणांसाठी अग्निपथ योजनेचे दार कायमचे बंद असणार आहे से केंद्र सरकारने निश्चित केले आहे.
मिळणार नाही नोकरी हे केल्यास..?
अग्नीपथ योजनेसाठी भरती होताना तरुणांना अग्निपथ या या योजने विरोधात तोडफोड , जाळपोळ आंदोलन करताना आपण सहभागी नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे असे केंद्र सरकारने निश्चित केले आहे.
अग्निपथ या योजनेसाठी भरतीचा अर्ज करताना जो कोणी अर्ज करता असेल त्याला योजने संबंधातील तोडफोड ,व जाळपोळ, व आंदोलन करताना सहभागी असल्याचे पुरावे द्यावे लागतील व त्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. आणि प्रत्येक उमेदवाराला पोलिसांच्या निरीक्षणाखाली पडताळणी केली जाईल. जर एखाद्या उमेदवारा विरुद्ध गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद असल्यास त्याला या योजनेतून बाद केले जाईल.

0 Comments