मागच्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात होत असलेल्या राजकारणाचे सर्वत्र फारच चर्चा आहे. हे राजकारण आता खूप टोकाला गेल्या असल्याने महाराष्ट्रातील सरकार पक्ष व विरोधी पक्ष यांच्याकडून खूप सारे मोठे मोठे धक्के पाहायला मिळाले आहेत. तरी अद्याप ही उद्धव ठाकरे यांनी याबाबत कोणतेही भाष्य केले नव्हते परंतु आज(22 जुन) रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केले.
असे म्हणाले ठाकरे...
" मी या क्षणाला व आत्ता मुख्यमंत्री या पदाचा राजीनामा देणार, 'पण तुम्ही राजीनामा द्या' असे मला शिवसैनिकांनी सांगावे. भाजप किंवा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यामधील लोकांनी 'मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या' असे म्हटले असते तर एक वेळ मला मान्य असते!पण दुःख मला यायचे होते की आपलेच शिवसैनिक बांधव माझ्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाची वाट पाहत आहेत... सुरतला किंवा इतर कोणत्याही राज्यात जाऊन माझ्यावर टीका करण्यापेक्षा, इथे समोर मला सांगा की 'तुम्ही नालायक आहात','तुम्ही मुख्यमंत्री या पदाच्या लायकीचे नाही' ज्या क्षणी हे मला ते तोंडावर येऊन बोलतील त्याक्षणी मी मुख्यमंत्री या पदाचा राजीनामा देण्यास तयार आहे..."
माझीच लोकं मला नाकारतात..!
" मुख्यमंत्रीपदाची मला कोणत्याही प्रकारचा मोहमाया नाही. माझ्यासमोर येऊन मला माझ्या चुका सांगा, मी राजीनामा द्यायला तयार आहे, मी आता संध्याकाळी या क्षणाला सुद्धा राजीनामा द्यायला तयार आहे. त्याच बरोबर मी या क्षणाला मुख्यमंत्री पद व त्याचबरोबर माझ्या शिवसेना प्रमुख या पदाचा सुधा राजीनामा द्यायला मी आता सध्या तयार आहे. माझ्या ऐवजी जर एखादा शिवसैनिक जर मुख्यमंत्री म्हणून या पदाला येणार असेल तर मी आनंदाने व खुशी खुशी मुख्यमंत्री या पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे.माझी सर्वांना नम्र विनंती आहे की मी जर मुख्यमंत्री या पदाच्या लायकीचा नसेल तर गायब झालेल्या सर्व आमदार यांनी पुढे यावं व माझ्या राजीनाम्याचे पत्र घेऊन राजभवनात द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो..."
मी तयार आहे..?
" ज्याला कोणाला वाटत असेल की शिवसेना प्रमुख म्हणून मी नालायक आहे, तर मी शिवसेनेचे सुद्धा नेतृत्व सोडायला तयार आहे पण हे सांगणारा एखादा शिवसैनिकच हवा इतर कोणत्याही विरोधक पक्षाचा कोणताही व्यक्ती नसावा... "
" शिवसेना व हिंदुत्व हे एक मेहताला जुळलेले एक घट्ट नातं आहे यामध्ये मी कसलाही दूरस्व आणणार नाही. माझ्या तमाम शिवसैनिकांनी मला येऊन असे सांगावे मी काय असे केले तिच्यापासून शिवसेनेचे शिवसैनिक व बाळासाहेब ठाकरे यांच्या महान विचारांपासून शिवसेना दूर चालत आहे..."
0 Comments