इथे आहे जगदंबा तलवार | जगदंबा तलवार माहिती | स्वार्थी लोकांमुळे तलवार राहिली बाहेर...



छत्रपति शिवरायांकडे नेमके किती तलवारी होत्या याविषयी कोणतेही ठोस पुरावे समोर आलेल नाही, तरीही छत्रपती घराण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या प्रतीनुसार तसेच कागदोपत्री मिळणाऱ्या नोंदी मधून शिवाजी महाराजांच्या तीन तलवारी होत्या असे  ज्ञात आहे.

पहिली तलवार 

यातील एक तलवार सिंधुदुर्ग किल्ल्यावर असून त्याच संवर्धन करण्याचे काम युवराज संभाजीराजे छत्रपती व इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केलेले.हि तलवार शिवाजी महाराजांच्या मूर्ती समोर काचेच्या पेटीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेली आहे.

भवानी तलवार 

भवानी तलवारी विषयी महाराष्ट्रातल्या प्रत्येकालाच विलक्षण आकर्षण आहे, आणि भवानीच्या अस्तित्वाबाबत शोध अविरतपणे सर्वच संशोधक करत आहेत. 

जगदंबा तलवार 

शिवाजी महाराजांच्या आणखी एक तलवारीचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांत पाहायला मिळतो . 'जगदंबा' असे या तलवारीचे नाव. 

लंडन मध्ये तलवार कशी गेली

हि जगदंबा लंडनला गेली कशी? यामागे सुद्धा एक कहानी आहे.

ऑक्टोंबर 1875 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स भारत भेटीला आला असता त्याला भारतातील राज्य राजवाड्यांनी मौल्यवान वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या.


कोल्हापूरच्या गादीवर छत्रपती शिवाजी महाराज (चौथे) विराजमान होते. कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रिन्सला एक अमूल्य भेट नजराणा म्हणून एक जुनी तलवार काहीशी नवीन काम करून सुंदरपणे सजवली भेट देण्यात आली. 


या चौथ्या शिवाजी महाराजांच्या अल्पवयीन वयाचा फायदा घेऊन प्रिन्सला ही भेटवस्तू देण्यास प्रवृत्त करणारे  व्यक्ती होती छत्रपतींचा दिवाण माधव बर्वे.


या भेटीदरम्यान नजराणा म्हणून मिळालेल्या वस्तूंची यादी बनवण्यात आले आणि वस्तूंची नोंद असलेला कॅटलॉ. पुढे Catalogue Collection Of Indian Arms Object Off Art या नावाने प्रकाशित करण्यात आला. चौथ्या शिवाजी महाराज यांनी भेट म्हणून दिलेली तलवार दुसऱ्या तिसऱ्या कुणाची नसून ती होती,मराठा स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांची होती, असं नमूद करून ठेवण्यात आले. या कॅटलॉ मध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला सदर तलवार छत्रपती शिवाजी महाराज यांची आहे.

जगदंबा तलवार कोठे आहे?

सध्या ही तलवार लंडन मधील महाल बोर्स हाऊस मधल्या इंडियन हॉल मधील  केस ऑफ आमर्स मध्ये ठेवण्यात आलेली आहे. या तलवारीचा  क्रमांक 201 असून कॅटला मधील दोन वेळेस त्या तलवारी शिवाजी महाराजांनी तलवार असे संबोधण्यात आले आहे,तसेच कोल्हापूरच्या शस्त्रागारात असलेल्या कागदपत्रांमध्ये या तलवारीबद्दल अजून बराच काही तपशील वाचायला मिळतो.


तलवारीचे नाव-जगदंबा असे  

माणके-44

पाचा-10

एकूण पराज हिरे-13

पाचा-18

माणके-467


या काजदपत्राचा उल्लेख कडोलीकर यांच्या (शिवाजी च्या तलवारी ची गोष्ट) या पुस्तकात सविस्तरपणे दिलेला आहे.


तसेच इंद्रजीत सावंत सर यांच्या (शोध भवानी तलवारीचा) या पुस्तकात जगदंबे विषय अनेक तपशील वाचायला मिळतो. 


म्हणजेच काय तर लंडन मध्ये असणारे तलवार छत्रपती शिवाजी महाराजांची असून तिचा पूर्वापार चालत आलेले नाव जगदंबा हे स्पष्ट केलेले आहे.

जगदंबा तलवारीची लांबी

तलवारीची लांबी 121 सेंटीमीटर म्हणजे जवळजवळ 4 फूट भरते. तलवारीच्या मुठीवर संपूर्णपणे सोन्याचा काम केलेले आहे व तलवार अतिशय सुंदर असून वजनाने कमी आहे. 

जगदंबा तलवार पुन्हा भारतात 

तलवार भारतात परत आणण्यासाठी अनेकांनी प्रचंड मेहनत केली, पाठपुरावा केला. 


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवप्रेमी (बॅरिस्टर ए.आर.अंतुले) यांच्या काळात महाराष्ट्राचे राजकारण या तलवारी मुळे ढवळून निघाला होतं.


तलवार भारतात आणण्याची तयारी सुद्धा झाली होती, त्यांनी सुरू पण गेले, पण दुर्दैवाने त्यांचे कष्ट फळाला आले नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची महाराजांनी तलवार मात्र आजतागायत भारतात परत आलेली नाही.

स्वार्थी लोक..!

काही स्वार्थी लोकांच्या नादा आणि विचारामुळे आपल्या मातीतल्या शौर्याचे प्रतीक असलेला जाज्वल्य ठेवा भारता बाहेर गेला.

Post a Comment

0 Comments