हॉटेल चे नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती चटपटीत आणि मसालेदार पदार्थ आणि ती हॉटेल वाली वेगळी चव. आपण खूप गाव हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जातो. त्याप्रमाणे आपले आवडते हॉटेल्स फिक्स असतात. हॉटेल वर जाऊन जेवायचं म्हणजे मनसोक्त जेवण करणे, यात कितीही खर्च आला तरी चालेल.
पण कधीधी हॉटेलच बिल आपल्या हातात आलं की 'एवढं कसं झालं'? हा प्रश्न पडतोच...
तुम्ही हॉटेल जाऊन जेवण करत असाल, तर जेवण झाल्यावर टेबलावर बिल आणून दिले जाते तेव्हा त्यामध्ये हॉटेलचा सेवा कर म्हणजेच Service Charge देखील असतो. (खरेतर हे तुम्हाला माहीत नसेल की हा लावला जाणारा कर पूर्णपणे बेकायदेशीर आहे.)
असे सरकारकडून (गुरुवारी.2 जून 2022) रोजी सांगण्यात आला आहे.
तरीसुद्धा जर हॉटेल तुमच्या कडून जबरदस्ती सेवा कर घेत असेल, तर ग्राहकाला पूर्णपणे कायदेशीर अधिकार असणार. सरकारने गुरुवारी बोलावण्यात आलेल्या बैठकीत"( सर्विस चार्ज घेणे) हे बेकायदेशीर असल्याचे हॉटेल असोसिएशनला सांगण्यात आले आहे.रेस्टॉरंट आणि पटेल असोसिएशनला सर्विस चार्ज बंद करा" असे सांगितले आहे.
याबाबत ग्राहकांना कायदेशीर अधिकार देण्यात येणार आहेत पुढील काळात. 2017 च्या कायद्यानुसार सर्विस चार्ज भरणे किंवा न भरणे हे स्वतः ग्राहकांवर अवलंबून असे. तरीसुद्धा 2017 पासून हॉटेल्स आपल्याकडून सर्विस चार्ज च्या नावाखाली पैसे उकळत आहेत.
सर्विस चार्ज च्या नावाखाली पैसे उकळणे ही एक लूट आहे हेच लूट थांबविण्यासाठी सरकारने सर्विस चार्ज हे बेकायदेशीर असल्याचे सांगण्यात आले.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 _*आता तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजन! त्यासाठी ग्रुप जॉईन करा*_ 👉 *https://chat.whatsapp.com/BbI59GAQiac8DBsT5k2J0R
_*Telegram*_👉*https://t.me/RTimesNews
➖➖➖➖➖➖➖➖➖
0 Comments