गुजरात कडून महाराष्ट्राचा जी समुद्र किनारपट्टी आहे त्या भागात दोन वेगवेगळे कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याचे कळते. त्यामुळे याचा परिणाम म्हणून सातारा तसेच कोल्हापूर त्याचबरोबर कोकण या भागात अति मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान खात्याने दर्शवले आहे. हा अतिमुसळधार पाऊस (6 जुलै ते 9 जुलै) पर्यंत पडण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे.
त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात पुढील चार दिवसात म्हणजे (6 जुलै ते 9 जुलै) या पर्यंत मुसळधार पाऊस आहे. पुढील काही दिवसात मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
● रेड अलर्ट झोन (अतिवृष्टी, मुसळधार पाऊस, पुराचा धोका): रायगड,सातारा,रत्नागिरी, कोल्हापूर,पालघर.
● ऑरेंज अलर्ट झोन (साधारण पाऊस किंवा मुसळधार): नाशिक, कोल्हापूर, पुणे, सातारा, पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड.
● येल्लो अलर्ट झोन (साधारण पाऊस): धुळे, नंदुरबार, संभाजीनगर, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड.

0 Comments